दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद, दि. 7 : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी अद्यावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा-सुविधांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णास सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रस्तावित ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, दुरूस्ती यावर लक्ष देवून येणारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे लक्ष द्यावे असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोना विषयक आढावा बैठकीत प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर गलांडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी तसेच आरोग्य यंत्रणेचे पदाधिकारी उपस्थित होते.


