अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
सगळ्यांचे सुखी चेहरे पाहून
आपल्यालाही वाटतं
आयुष्य त्यांच्या सारखच व्हावं …..
पण त्या प्रत्येक चेह-यामागे लपला असतो
भकासपणा…
भकासपणा निराशेचा,अंधाराचा,कोरडवाहू नात्यांचा..
आरशातला चेहरा अन् चेह-यातला चेहरा
यात फरक असतोच…
तो फरक कळायला लागला की वाटतं
आपलंच आयुष्य सुंदर आहे…
पण माणसाचा स्वभावच आहे मुळी
पुन्हा पुन्हा समोरच्यामध्ये डोकावण्याचा…
सगळेच एकमेकांचा चेहरा मिळवू पहातात
पण कळत नाही कुणालाच
की ते असंख्य चेहरे म्हणजे फक्त मुखवटे असतात…
-मधुरा संजय काळे
अंजनगाव सुर्जी
जि.अमरावती