गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- शिवसेना-युवासेना हिवरखेड तर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन शिक्षण पद्धती फायदेशीर आहे की नाही या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात अजिंक्य महेंद्र कराळे हिवरखेड प्रथम,कु.मोनिका जितेंद्र वानखडे पातुर्डा व्दितीय तर आकाश वासुदेव दंडे पंचगव्हान ह्याने तृतीय क्रमांक पटकावला. तर पवन श्रीकृष्ण उंबरकार हिवरखेड व कु.निकिता रमेश पुनकर आसेगाव बाजार यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या निबंध स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस १५०१ रु.स्व.भाऊदेवराव गिऱ्हे स्मृतिप्रीत्यर्थ मनिष गिऱ्हे यांचेतर्फे, द्वितीय बक्षीस १००१ रु.स्व.शालिनीताई भांबुरकर स्मृतिप्रीत्यर्थ अंकेश भांबुरकर यांचेतर्फे तर तृतीय बक्षीस ७०१ रु.प्रशांत प्रभाकरराव भोपळे यांचेतर्फे ठेवण्यात आले होते. जवळपास ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वी करून आयोजकांचा उत्साह वाढवला.प्रथम बक्षीस विजेता अजिंक्य कराळे ह्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती फायदेशीर नाही या विषयावर ऐतिहासिक दाखले देत,आकडेवारीसह या शिक्षण पद्धतीचा फोलपणा आपल्या निबंधातून मांडला.आश्चर्याची गोष्ट म्हणजे ७५ % पेक्षा जास्त स्पर्धकांनी या शिक्षण पद्धतीला आपल्या निबंधाच्या माध्यमातून नाकारले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख आकाश इंगळे यांच्यासह अभिषेक धांडे, अंकुश निळे,नितीन नांदोकार,अक्षय नाठे, प्रफुल्ल कवळकार शिवम दही गौरव निंबोकार दीपक घावट यांच्यासह शिवसैनिकांनी प्रयत्न केले.तसेच या स्पर्धेसाठी प्रा.गौतम इंगळे, प्रा.विजय दुधे,प्रा.अमोल येऊल,प्रा.श्रीकांत परनाटे,प्रा.माधव गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी बक्षिसे देणाऱ्या बक्षीसदात्यांचे,सहकार्य व परिक्षण करणाऱ्या शिक्षकांचे शिवसेना शहर प्रमुख आकाश इंगळे यांनी आभार मानले असून विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.