पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : दि 17 सेप्टेंबर
औसा तालुक्यातील हासेगाव मध्ये श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ज्ञानसागर विद्यालय हासेगाव मध्ये दि . 17 सेप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला . मराठवाड़ा मुक्ती दिनानिमित्त ज्ञानसागर विद्यालयामध्ये भारताचा तिरंगी झेंडा फडकवण्यात आला. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांच्या हस्ते करण्यात आले . नेमका हा दिवस म्हणजे महाराष्ट्राचा राष्ट्रिय सन म्हणुन साजरा केला जातो . या प्रसंगी उपस्थित ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक कालिदास गोर , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , संचालक आत्माराम मुलगे , प्राचार्या योगिता मेदगे , प्राचार्या शामलिली बावगे , इत्त्यादि सदस्य उपस्थित होते .