गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : एकीकडे आपले सरकार म्हणून जनतेमध्ये मध्ये त्याचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण घालवून त्यांचा विश्वासघात करायचा असे दुटप्पी धोरण अवलंबविनार्या महाविकास आघाडी सरकारचा जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, शहरध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन सादर करुन महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. गेले 6 महिने महाविकास आघाडी सरकार ओ.बी.सी समाजाच्या राजकीय आरक्षणा बाबत टोलवा टोलवी करत आहे. ओबिसी समाजाचा इंम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी तातडिने कार्यवाही सुरु करा असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्यसरकारला सातत्याने सांगीतले असुन आघाडी आघाडी सरकारने गेल्या 6 महिन्यात काहिच हालचाली केल्या नाहीत.इंम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही उपलब्ध करून दिला नाही. या हलगर्जीचा व परिणाम म्हणून ओबिसी आरक्षणा शिवाय 5 स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणूक जाहिर झाल्या आहेत.सन 2021 मध्ये होणाऱ्या नगर परिषद सन 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणूका मध्ये ओबिसी समाजाला आरक्षण न देता ध्यावयाच्या असल्याने राज्यतील मुख्यमंत्री यांनी सवर्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी प्रभावी पणे बाजु मांडलिच नाही व वकिलाची नियुक्ती केली नाही. ओबिसी समाजाच्या विश्वास घात करुन पाठित खंजीर खुपसला असुन अशा या महाविकास आघाडी सरकारचा या वेळी निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आले. सदर निवेदवर महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार, तालुका सरचिटणीस धर्मेश चौधरी, सरचिटणीस रवि गडोदिया,गजानन गायकवाड,भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले,नगरसेवक अनुप मार्के,मंगेश सोळंके,विजय देशमुख, राहुल झापर्डे, अतुल विखे, सुनिल भुजबले, राजेश छांगाणी,गजानन नळकांडे, गणी शाह,जयप्रकाश छांगाणी, विजय बार्डे, राजेश पालिवाल, कैलास भटकर,सुमित गंभिरे,रवि शर्मा ,राहुल मिटकरी,गोपाल बंड,राजा कुरेशी,रफिक कुरेशी,श्याम वानखडे, अभय काळे,मोहन खेडकर,सचिन वासनकार,सचिन सपकाळ, रुपेश चव्हाण, पुरुषोत्तम जायले,निखिल खारोडे,यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.