गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगाव जामोद : तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रामीण भिंगार येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी विहिरीमध्ये वीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह तरंगत असताना तेथील नागरिकांना दिसला असता नागरिकांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली भिंगारा येथील पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशन व सदर घटनेची फिर्याद महिलेच्या नातेवाइकांच्या मदतीने पोलीस स्टेशनला दिली सदर घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे पोलीस कॉन्स्टेबल संजय राऊत पोलीस शिपाई सचिन राजपूत पोलीस शिपाई सुनील वावगे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गावकर्यांच्या मदतीने सदर महिलेचे विहिरीतून बाहेर काढले व पंचनामा केला असता सदर महिलेचा मृतदेह अतिशय वाईट स्थितीमध्ये होता म्हणून घटनास्थळावर जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून सदर महिलेचे शवविच्छेदन घटनास्थळावर करण्यात आले सदर मृत महिलेचे नाव संतुबाई राजाराम डावर राहणार भिंगारा वय 22 वर्षे आहे ही महिला शनिवार दिनांक 11 सप्टेंबरच्या रात्री पासून बेपत्ता होती सदर महिलेच्या मृत्यूप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी 68/ 2021 दाखल केला असून सदर महिलेचे लग्न दोन वर्षांपूर्वी भिंगार येथील राजू डावर या तरुणासोबत झाले होते तसेच महिलेला एक वर्षाची मुलगी आहे मृतक विवाहितेच्या भावाने जळगाव पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिली की माझ्या बहिणीला तिचा पती नेहमी दारू पिऊन शिविगाळ करित असे व मारहाण करित असे त्याच कारणाने त्रासुन माझ्या बहिणीने ग्रामपंचायत जवळील सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे मृतक विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून विवाहितेच्या पतीविरोधात अप नं 761/ 2021 कलम 306 498(अ) नुसार राजू सुरपाल डावर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर भास्कर व पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार हे करीत आहेत.