अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोला वन्यजीव विभाग अकोला अंतर्गत येणारे पातुर वनपरिक्षेत्र येथे निसर्ग कट्टा तर्फे वृक्षारोपणाचा व बीज हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमास पातुर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिक्षेत्र अधिकारी श्री धीरज मदने हे उपस्थित होते तसेच निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल सावंत व शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मिलिंद शिरभाते, श्री मनोज लेखनार तसेच श्री अविनाश घुगे फॉरेस्ट गार्ड व सर्व सहाय्यक वनाधिकारी वन मजूर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पातुर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणारे पातुर निसर्ग परिचय केंद्र येथे नुकतीच तयार केलेली नर्सरी ची पाहणी करण्यात आली सदर नर्सरीमध्ये स्थानिक प्रजातीचे एकूण बारा ते तेरा प्रकाराचे प्रजातींचे रोपे वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे अत्यंत मेहनत घेऊन तयार करण्यात आलेली आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्रच एकूण आनंदाचे वातावरण आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पातुर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच क्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी आज पासून स्थानिक प्रजातींच्या बिया गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. सदर बिया गोळा केल्यानंतर याच क्षेत्रात असलेल्या नर्सरीमध्ये त्याची रोपे उगवली जातील व हीच रोपे नंतर याच वनपरिक्षेत्रात असलेल्या जंगलामध्ये लावण्यात येतील अशी माहिती श्री धीरज मदने यांनी आज दिली. अकोल्याहून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे पर्यटन स्थळ कि ज्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे वेगवेगळ्या प्रकारचे झुले व इतर वन्यजीवांची माहिती असलेले फलक व वन्य प्राण्यांचे पुतळे या प्रक्षेत्रात पर्यटकांच्या करमणुकी करिता ठेवण्यात आलेले आहेत. कोरोना च्या या लॉकडाउन नंतर हे प्रक्षेत्र सर्व पर्यटकांसाठी शासकीय नियमांच्या अधीन राहून सुरू करण्यात येईल असे श्री धीरज मदने प्रक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.या रोपवाटिकेला निसर्ग कट्टा परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व सोबतच बेलाच्या बियांचे वाटप सुद्धा करण्यात आले.


