अनिल ठोकळ / बुलढाणा
कनका : मेहकर पंचायत समितीच्या सभापती निनाताई दिलीपराव देशमुख यांनी तालुक्यातील गावात जाऊन प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत आढावा बैठक घेऊन. गावकऱ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर विश्वी येथे दुसरा डोज घेण्यासाठी गावकऱ्यांनी उत्प्फुर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. मात्र ॶॅपमध्ये ऑनलाईन नोंदणीसाठी तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र गावकऱ्यांनी लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.लस घेण्यासाठी शोसल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले. यावेळी दिलीपबापू देशमुख यांनी लसीचा दुसरा डोज घेऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर यावेळी दिलीपबापू देशमुख यांनी सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.गावकऱ्यांनी घाबरून न जाता स्वतः समोर येऊन प्रत्येकाने लस टोचून घ्यावी व आपल्या परिवारासह सर्वांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे.. असे आवाहन यावेळी दिलीपबापू देशमुख यांनी केले.. यावेळी दिलीपबापू देशमुख, तलाठी संदीप पवार, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते..