अजिंक्य मेडशीकर
मालेगांव तालुका प्रतनिधी
मालेगाव तालुक्यातील शिरपूर आरोग्य वर्धणी केंद्राला मिळाली रुग्णवाहिका जिल्हा परिषद चे अध्यक्ष डॉ शाम गाभने यांच्या प्रयत्नातून शिरपूर अरोग्यावर्धिनी केंद्रास रुग्णवाहिका मिळाली आहे.सदर रुग्णवाहिका मिळाल्याने येथील रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.येथील आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत शिरपूर सह 33 खेड्यातील, जवळपास 52 हजार नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येते. गरोदर माता व इतर रुग्णांना आरोग्य केंद्रात घेऊन येण्यासाठी येथे पूर्वी एक जुनी रुग्णवाहिका होती मात्र रुग्णवाहिका नेहमी नादुरुस्त असल्याने रुग्णांची पायपीट होत होती. सदर बाबीचा विचार करून जिल्हा परिषद चे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने शिरपूर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रास रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे. दिनांक 5 जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रुग्णवाहिका आरोग्यवर्धिनी केंद्रास सुपूर्द करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ समीर मानधने व डॉ प्रणिता काकड व आरोग्यवर्धिनी केंद्राचे कर्मचारी तसेच प स सदस्य शकील भाई पठाण, माजी सरपंच गणेश भालेराव, नंदू भाऊ गोरे, माजी सरपंच सुशांत जाधव, सुरेंद्र कदम,सलीम रेघिवाले, गोपाल जाधव इतरांची उपस्थिती होती.