अनिल ठोकळ, जिल्हा प्रतिनिधी
मेहकर : शेतकरी हा कोरोनामुळे आधीच संकटात सापडला असून मान्सूनच्या पूर्वतयारी नुसार खरीप पेरणीसाठी पूर्वनियोजन करण्यासाठी शेतीची मशागत खते बी बियाणे खरेदी करणे तसेच ट्रॅक्टर ची कामे करणे पेरणी साठी तयारी करत असून पीक कर्जासाठी शेतकरी बँकाकडे चकरा मारत असून बँकांकडून सदर शेतकऱ्यांना मुद्रांक पेपर ची मागणी होत आहे तो पर्यंत पीक कर्ज मिळणार नाही अशी अडवणूक होत असल्यामुळे सध्या मेहकर तहसीलमध्ये मुद्रांक विक्रेते हे उपस्थित राहत नसून शेतकऱ्यांना तहसीलमध्ये चकरा मारावा लागत असून सुद्धा मुद्रांक मिळत नाही. शेतकऱ्यांचे भाड्यामध्ये आर्थिक खर्च होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत असून कोरोणाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती मधून शेतकरी जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने मदत केली पाहिजे व सदर अडचणीतून शेतकऱ्यांना बाहेर काढून त्यांना तात्काळ मुंद्राक पेपर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे सोयीचे होईल व आपल्या शेतीसाठी बी-बियाणे खरेदी करून पेरणीचे नियोजन करता येईल. याकरिता आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन मेहकर तहसील मध्ये तात्काळ मुंद्राक विक्रेते यांना आदेश देऊन मुद्रांक पेपरचे व्यवस्था शेतकऱ्यांना करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन शेतीचे संपूर्ण कामे करता येतील. यासंदर्भात डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी उपविभागीय अधिकारी मेहकर राठोड, तहसीलदार मेहकर डॉ. संजय गरकळ तसेच दुय्यम निबंधक प्रकाश टाक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सदर बाब निदर्शनास आणून दिली व संबंधित शेतकऱ्यांना मुंद्राक मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून तातडीने कारवाई करावी अशी विनंती केली व डोणगाव जानेफळ मेहकर अशा शहरांमध्ये मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्पसह उपलब्ध करून स्टॅम्प देण्याचे आदेशित करावे जेणेकरून तहसील मध्ये गर्दी होणार नाही व झोन वाईज शेतकऱ्यांना त्याचा भागांमध्ये मुंद्राक घेणे सोयीचे होईल कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची सुद्धा दक्षता घेता येईल व शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागेल अशी भूमिका प्रशासनाने घ्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला


