राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली – एटापल्ली तालुक्यातील सुराजगड प्रकल्प मधील मजुरांना तसेच मदत करणाऱ्यांना नक्षलींकडून धमकी चे पत्र टाकण्यात आले. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरजागड पर्वतावर कामाला आल्यास जीवे ठार मारणार, दुसऱ्यांदा सांगितल्या जाणार नाही. असे नक्सलवाद्यांनी टाकलेल्या पत्रकात हिंदी भाषेत मजकूर आहे. तर आता या मजुराचा वाली कोण ?असे प्रश्नचिन्ह मजुरासमोर निर्माण झाले आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प हा विदर्भातील बहुचर्चित प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्यातील हजारो युवकांना रोजगार मिळेल या आशेने प्रतीक्षा करीत आहेत. लायड्स मेटल या कंपनीचा नावाने लिझ मंजूर असलेले लोहखनिज उत्खनन काम ग्रामसभा, नक्सल, इतरांचा विरोध असल्यावरही धडाडीवर सुरु आहे. असं कसं असाही प्रश्नचिन्ह अनेकांचा मनात चलविचल करतच आहे. जवळपास तीन वर्षानंतर लॉयड्स अँड मेटल कंपनीकडून लोहखनिज उत्कणांचे काम तामिळनाडूतील त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. ली. कंपनीला पेटी कंत्राट देऊन यात कुठलीही सुरक्षा नसतानाही उत्खननाचे काम सुरु करण्यात आले. निराशावादी मनातून रोजगार उत्पन्न होईल हि आशा निर्माण झाली. अन बरेच स्थानिक लोक कामाला लागले. पण नक्सलीचा मनात दुसरं काही सुरु होते. त्यांनी पत्रके टाकून हिंदीत लिहिलं कि, “एटापल्ली, गुरुपल्ली, जीवनगट्टा, कूनबेके भाइयों सुरजागड पहाडीपर काम को आना जल्द से बंद करो, नकी मौत का हिस्सा बनो. दुबारा संदेश नही दि जायेगी, भाकपा माओवादी भामरागड एरिया अशा आशयाचा मजकूर पत्रकात नमूद आहे. उत्खनन करणाऱ्या लोकांना किंवा कंपनीला मदत करणार्याचा वाली कोण असं प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी कंपनी किंवा शासन कोणते अधिकृत निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.