अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव जवळच समृद्धी महामार्गाच्या कळंबेशवर कॅम्पवर 10 -12 जणांनी चौकीदाराला मारून 1 लाख 20 हजारांचा मुद्देमालाची चोरी केली.पोलिसांनी 7 जणांच्या घरातून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे दोघांना अटककेली असून उर्वरित फरार आहेत दि. ३१. मे रोजी समृध्दी महामार्ग साईट क.२४३ वर रात्री ११.०० वा. चे फिर्यादी विश्वसम्राट वानखडे याने मालेगाव पो.स्टे.ला येवून माहिती दिली.रोडचे कामा करीता लागणारे सामान हे कॅम्प साईट क्रमांक २४३ वर ठेवलेले आहे. कॅम्प साईट २४३ चे जवळचे समृध्दी महामार्गा वरील पुलाचे काम सुरू असून त्याकरीता मोठया मशिन, लाईट वेल्डींग मशिन, चाँशी मशिन व ईतर लोखंडी सामान ठेवलेले असून रात्री ११.३० वा.चे दरम्यान १० ते १२ चोरटयांनी समृध्दी महामार्ग साईट क.२४३ वरील चौकीदार विवसम्राट अशोक वानखडे व ठाकुर यांना मारहाण करून त्या ठिकाणा वरून कॉकरीट व्हायबरेटर मीन तिन नग, तार कापण्याची मशीन ४ नग, वेल्डींग मशीन, डिझेली ६० लिटर, टिन पत्रे असा एकुण १,२०,०००/- रू चा माल चोरून नेला. तपासा मध्ये घरा मधुन गुन्हयात चोरी गेलेला मुदेमाल अंदाजे जवळपास १,००,०००/- रू चा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे. पैकी जगदीश उर्फ भारत कुंडलीक वानखडे व गणेश दौलत महाजन यांना अटक करण्यात आली असुन उर्वरित आरोपी फरार झालेपोलीस अधिक्षक ,अपर पोलीस अधिक्षक. उपविभागीय पोलीस अधिकारी वशिम यांचे मार्गदर्शना मध्ये पो.नि. आधारसिंग सोनोने, पोउपनि महल्ले, पोहेकॉ कोकाटे, पोहेकॉ ढेंगळे,नापोकॉ गजानन काळे, नापोकॉ गजानन झगरे, पोकॉ. नवल चरावंडे, पोकॉ. मोघाड,पोकॉ. गोपनारायण पोकॉ. वैशली तायडे, नापोकॉ संदीप निखाडे, नापोकॉ प्रशांत वाढणकर, पोकॉ. नारायण सरकटे, पोकॉ किल्लेकर यांनी कामगिरी केलेली आहे.


