राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – महाराष्ट्र परावैद्यकिय परिषद अधिनियम २०११ कलम ३१ पोटकलम १ मध्ये वर्णन केलेल्या अधिनियमानुसार ज्या प्रयोगशाळांची नोंद राज्य सरकारची नोंदवहित नाही अशा बेकायदेशीर प्रयोगशाळांना हा व्यवसाय करण्यात परवानगी नसतांना सुध्दा सुशिक्षित संधी साधु लोक अहेरी तालुक्यात बेधडक पणे क्लिनिकल लॅब, पॅथालॉजि या नावाने गोरखधंधा मांडून बसले आहे यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाही करण्याचे निवेदन भ्रष्टाचार निवारण समिती तर्फे तहसीलदार अहेरी मार्फत जिल्हाधीकारी गडचिरोली यांना देण्यात आला.
महाराष्ट्र पॅरावैद्यकिय परिषद अधिनियम २०११ [ Act || IOf 2016 ] अन्वये आदेशानुसार, अध्यक्ष महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद , मुंबई यांचे पत्रक कमांक १७५/२०२१ दिनांक १०/०५/२०२१, जि.का./ क.कार्या -३/अका.आव्यक / कावि ७७१/२०२१ दि . १७/०५/२०२१ . चे पत्र .यानुसार प्रयोगशाळा साठी परवाना आवश्यक आहे. अहेरी येथिल महालक्ष्मी क्लिीनिकल लॅब , हकिम ब्लड कलेक्शन सेंटर, स्वरा क्लिीनिकल लॅब, हकिम क्लिीनिकल लॅब, आलापल्ली सलुजा लॅब, प्रिया पॅथॉलॉजी लॅब, श्री क्लिीनिकल लॅब, हिना क्लिीनिकल लॅब या सर्वांची तपासणी करावे. अनाधिकृत वैधकीय प्रयोगशाळा व्यवसाय येथील सामान्य जनतेला सहन करावे लागत आहेत, हा सर्व प्रकार सर्व सामान्य जनतेला वाईट वाटत असून अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या प्रयोगशाळा यांचे सर्व दस्तऐवज तपासून दोषी आढळल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. कोविड -१ ९ च्या महामारिच्या कालावधित अशा अनेक अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी जनतेची अक्षरशः लयलूट चालवलेली असून, आपण या बाबीची तात्काळ गंभिर दखल घेऊन आपण अनाधिकृत वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेवर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले.