अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मेडशी:- येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणनार असून लवकरच प्रत्येक ग्रामस्थांना 55 लिटर मानसी प्रमाने पाणी मिळणार असल्याची माहिती सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांनी दिली.सुमारे दहा हजार लोकसंख्या वस्तीचे असलेले हे गाव या गावातील वार्ड नंबर 1,5 आणि वार्ड नंबर 4 अशी कायमस्वरूपी पाण्यासाठी त्रासलेले असतात.त्यांच्या त्रासाची दखल घेत सरपंच जमीर शेख गणीभाई यांनी जल जीवन मिशन अंतर्गत मेडशीचा समावेश करण्यासाठी आमदार अमित झनक यांच्याकडे पाठपुरावा केला आमदार झनक यांनी त्याची दखल घेत जि प पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन त्वरित मेडशीचा पाणीप्रश्न जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मिट्विन्या करिता मेडशीचा समावेश जल मिशन योजनेत करण्यात यावा याकरिता लक्ष केंद्रित केले आहे सर्वजण मेडशीच्या पाणीपुरवठासाठी जातिने लक्ष केंद्रित करित असल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या असून लवकरच ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याची माहिती सरपंच यांनी दिली यावेळी जी प सदस्य सौ लक्ष्मी प्रदीप तायड़े,प स सदस्य कौशल्याबाई रामभाऊ साठे, माजी प स सदस्य प्रदिप तायड़े,गजानन शिंदे, संजय भागवत,माजी सरपंच रमजानभाई गवरे, उपसरपंच धीरज मंत्री ,ग्रामपंचायत सदस्य अमोल तायडे ,मूलचंद चव्हाण, जगदीश राठोड ,उमेश तायडे ,गजानन करवते, ज्ञानेश्वर मुंडे ,प्रशांत घुगे आदिंची उपस्थिती होती.