-गुलाब नबी आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश-
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातूर
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी राखी जाधव ह्या विद्यार्थीनीला शैक्षणिक सत्र 2019-20 ला त्रुटी पूर्ततेसाठी समाजकल्याण विभागामार्फ़त अवगत करण्यात आले होते परंतु महाविद्यालय प्रशासन ह्यांनी हेतुपुरस्पर पणे सदर विद्यार्थीनीला अवगत केले नाही त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक सत्र व पुढील शैक्षणिक आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे त्यास जबाबदार असणाऱ्या महाविद्यालय प्राचार्य व कर्मचारी ह्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी काल 3 जून रोजी करण्यात आली त्याची दाखल घेत समाजकल्याण विभाग अकोला साहायक आयुक्त ह्यांनी प्राचार्य ह्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की समाजकल्याण कार्यलयामार्फत महाडीबीटी प्रणालीवर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठीतालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या असून बार्शीटाकळी तालुक्यातील महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित लिपिक ह्यांची कार्यशाळा च गुलाब नबी आझाद महाविद्यालयात झाली असून त्याची सर्व वृत्तपत्राद्वारे माहिती सुद्धा प्रसारित करण्यात आली होती.महाडीबीटी प्रणालीद्वारे वेळोवेळी अर्ज दुरुस्ती साठी डसबोर्ड वर सूचना सुद्धा देण्यात येतात निवेदनाच्या अनुषंगाने दाखल घेतल्यानंतर असे दिसून आले आहे की सदर विद्यार्थीनींचा ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज बघितला असता टी. सी.जोडले नसल्याचे दिसून आले समाजकल्याण कार्यलयामार्फत अर्ज आक्षेपीत करून त्रुटी पूर्ततेसाठी प्राचार्य ह्यांच्या लॉगिन वर पाठविण्यात आला तरीसुद्धा आपण सादर अर्जाची कुठल्याही प्रकारे दाखल न घेता अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवला.ही बाब शासकीय दृष्ट्या योग्य नसून सत्र 2019-20 ह्या शैक्षणिक वर्षाकरिता महाविद्यालय स्तरावरून अर्ज मंजूर करण्याची तारीख गेलेली असून त्यामुळे सदर विद्यर्थिनीला शैक्षणिक सत्र 2019-20 ला शिष्यवृत्ती पासून वंचित राहिली आहे.व त्यामुळे तिला शैक्षणिक सत्र 2020-21 ला शिष्यवृत्ती अर्ज भरता येऊ शकत नाही.व अशा परिस्थितीमुळे संबंधित मागासवर्गीय विद्यार्थिनी पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अभावी वंचित राहू शकते.उक्त योजनेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्रथम अंमलबजावणी अधिकारी असून आपल्या महाविद्यालयात प्राप्त होणाऱ्या अर्जावर वेळेत नियमित नियमानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे.परंतु वेळेत आपण संबंधित विद्यार्थिनींच्या अर्जावर कार्यवाही होणे अपेक्षित असताना महाविद्यालयाने ती केली नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजनेमध्ये आपण प्रथमदर्शनी हलगर्जी केली असून त्यामुळे ह्या सर्व बाबीचा खुलासा आपण तीन दिवसांच्या आत समाजकल्याण विभाग अकोला ह्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले असून आपण विहित वेळेत व समाधानकारक खुलासा सादर न केल्यास पालक विभागास नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग अकोला मार्फत गुलाब नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य ह्यांना देण्यात आले आहेत.


