अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
दिनांक.४ जून २०२१ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पदोन्नती मध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणी साठी रिपाइं (आठवले) अकोला महानगर अध्यक्ष गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष तथा अकोला जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले आहे.
रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर रिपब्लिकन पक्षा तर्फे दि.०१ जून २०२१ ते ०७ जून २०२१ पर्यंत आंदोलन सप्ताह करण्यात आले. पदोन्नती मधील आरक्षण हे मागासवर्गीयांच्या हक्क आहे.त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारला देण्याचे निर्देश दिले ,असताना सुद्धा राज्य सरकार निर्णय घेत नाही आहे.त्या निषेधार्थ आज रिपाइं (आठवले) व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हा महानगर च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने त्वरित घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे,रिपाइं महानगर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाठ , पूर्व अध्यक्ष अनिल पहुरकर , रीबविप प्रसिद्धी प्रमुख वैभव वानखडे, रिपाइं नेते सूरज वाडेकर,सिद्धू ओईंबे ,विजय सावंत,मिलिंद लबडे ,संतोष दाभाडे,शुभम वाघ,सनी मृदुंगे, उमेश इंगळे ,साजन शेगोकार, आदी उपस्थित होते.