अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
आज गुरुवार दि.03/06/2021 ला जि.प. शाळा गोरेगाव बु येथे कोव्हीड लसीकरण शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.सलग दीड वर्षापासून देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या विषाणूपासून वाचण्यासाठी हे लसीकरण शिबिरे देशभरात गावोगावांत घेतल्या जात आहेत.मात्र माहितीच्या अभावामुळे गावकर्यांमधे संभ्रम व भीती निर्माण झाली होती.ही भीती व गैरसमज नष्ट करण्यासाठी नूतन सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष संघदिप शेगांवकर व त्याच्या टिम ने घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम राबवली. ह्या फाऊंडेशन ने घेतलेल्या पुढाकारामुळे लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.समस्त गावकऱ्यांनी नूतन सोशल फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराचा लाभ घेतला. संबंधीत शिबिर हे प्राथमिक आरोग्य केंद्र (psc) कापशी अंतर्गत व डॉ.महल्ले वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. त्यावेळी संबंधीत कर्मचारी डॉ. रश्मी सराळे,आरोग्य सेवक सुनील वाघमारे,आरोग्य सेविका नवलकार मॅडम,गटप्रवर्तक तायडे व आशा स्वयंसेवीका सौ. विजया शेगावकर,सुरेखा शेगावकर, सुषमा खंडारे उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रमास अजयराव शेगावकर पं.स.सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तर संघदिप शेगावकर,कुणाल शेगावकर,गौतम शेगावकर, बाळकृष्ण शेगावकर, नागेश प्रधान यांनी परिश्रम घेतले.संबंधीत कार्यक्रमात गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ. जयश्रीताई शेगावकर, दुष्यंतराव शेगावकर, ग्रा.प.सदस्य महादेवराव भीसे,महीपालराव शेगावकर, ग्रा. प. सदस्य आकाश शेगावकर, गणेशराव ढोरे, संजयराव ढोरे, गजाननराव ढोरे, अनंतराव वाकोडे, महादेवराव हांडे गावचे समस्त लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अन्य गावकरी यांनी फिजिकल डीस्टंन्सींग चे काटेकोर पालन करीत आपले मोलाचे सहकार्य व उपस्थिती दर्शवली.