सौ मंदा रमेश अंधारे यांचे निधन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातूर
सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व प्रसिद्ध साहित्यिक डॉ रमेश अंधारे यांच्या पत्नी व सरस्वती विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ मंदा अंधारे यांचे बुधवार दिनांक 2 /6/ 2021 ला हैदराबाद येथील एशियन हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या त्यांचेवर हैदराबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले सौ मंदा या काही महिन्यांपासून लिव्हर सोरायसिस या आजाराने ग्रस्त होत्या त्यांचे मागे पत्नी दोन मुले सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ शिर्ला (अंधारे) यांचे वतीने शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.