किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातुर
दिनांक :- 2 जून रोजी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय आयोगाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये आपल्या पातूर तालुक्यातील तांदळी खुर्द! येथील रहिवासी प्राचार्य राजेंद्र उत्तमराव लखाडे यांच्या पत्नी डॉक्टर. निलिमा सरप लखाडे यांची महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय आयोगाच्या डायरेक्टर पदी नियुक्ती करण्यात आली.त्या समाजशास्त्रज्ञ,PHD. आहेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे अनेक शोध प्रबंध प्रकाशित झालेले आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे ओबीसी. VJNT, SBC. समाजाला निश्चितच न्याय मिळेल पातूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांन मध्ये आनंद व्यक्त होत आहे हि माहिती सुधाकर भाकरे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अकोला यांनी चॅनल सोबत बोलताना सांगितले आहे


