दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद- दि-3 जून निवडणूकीसाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हिएम मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज औरंगाबाद रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या तीन गोदामांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना गोदामातील वीज यंत्रणा व अद्यावत सुरक्षा यंत्रणासह गोदाम स्वच्छ ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सूचना दिल्या.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, उपअभियंता अशोक येरेकर, शाखा अभियंता (बांधकाम) अनिल होळकर, विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती रेवलकर तसेच वखार महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार ईव्हिएम मशीनची सुरक्षा आणि अद्यावत सुविधांबाबत अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुविधा आणि सुरक्षा याबाबत पाहणी करुन संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देशित केले.