अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
“मोडेन पण वाकणार नाही, मरेल पण झुकणार नाही” हा संघर्षमंत्र देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारे देशाचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतथीनिमित्त विनम्र अभिवादन वाहण्यासाठी आज मेडशी मधील गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने गांधी चौक येथे भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. येथे उपस्थीत सर्व जन आज मुंढे साहेब यांच्या आठवणीने गहिवरून गेले.कारण मुढे साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पुर्ण आयुष्य गोरगरीब जनतेच्या लोककल्याण साठी समर्पित केले होते.त्यानि आयुष्यभर दीन दुबळ्यांची सेवा केली होती. त्यामुळे लोकांच्या मनातील नेते लोकनेते अशी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र च नाही देशात झाली होती.अश्या तेजस्वी व्यक्ती महत्व असलेल्या लोकनेत्याने आजच्या दिवशी जगातून निरोप घेतला होता. आणि त्याची आठवण म्हणून मेडशी येथे दरवर्षी आदरांजली वाहण्यासाठी मुंढे प्रतिष्ठान चे अध्यक्ष गोपाल घुगे व श्रीकांत घुगे, योगेश घुगे, सागर घुगे, दत्ता मुंढे, शिवम घुगे,अभी घुगे, आकाश घुगे, वैभव नागरे, कौस्तुभ मेडशीकर, सागर मुंढे आदींची उपस्थिती होती.


