तेलंगाना राज्यातुन छत्तीसगढ राज्यात जात होती साखर
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा- गडचिरोली जिल्हातील सिरोंचा तालुक्यातुन जाणाऱ्या महामार्गावरील सोमनपल्ली गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असून ही कामे कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देत मार्ग काढावा लागत आहे.गोदावरी,प्राणहिता,इंद्रावती या तीन नद्यांना पूर आल्याने नद्यांना लागून असलेल्या नाल्याना बॅक वाटर येऊन बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ वाहनाकरिता ये-जा करण्यासाठी तात्पुरती रस्ते बनवले होते.मात्र नद्यांचा पाणी बॅक येऊन तात्पुरता बनवलेले रस्ताच पाण्याखाली बु़डाल्याने सिरोंचा-असरल्ली-भोपालपट्टणम छत्तीसगढ रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सकाळी तेलंगणा राज्यातून साखर भरून ट्रक छत्तीसगढ राज्यात जात होती.सोमनपल्ली गावाजवळ बांधकाम होत असलेल्या पुकाजवळ रस्ता खराब असल्याने सदर ट्रक चिखलात फसली होती.मात्र इंद्रावती नदीला अचानक पूर आल्याने सोमनपल्ली नाला इंद्रावती नदीचा काठाला लागून असल्याने नदीचा पाणी बॅक येऊन काही वेळातच पाण्याने नाला भरला.त्यामुळे नाल्यात फसलेला साखरेने भरलेला ट्रक संपुर्ण पाण्यात बुडाला. ट्रकमध्ये असलेली साखर पूर्णपणे विर गळत असून नाल्याच्या पाण्याला गोडवा निर्माण झालेला आहे.त्यामुळे साखर बनली शरबत अशी अवस्था झालेली आहे.सोमनपल्ली नाल्यावर साखर भरलेली ट्रक पाण्याखाली गेल्याने ट्रक मालकाचे लाखो रुपये नुकसान झाले आहे.