अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
विझोरा :- शेतकर्यांना पिकांवर फवारणी करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत गीताई ह्युमनकाईड डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय आमखेडाच्या कृषीकन्या अर्पिता हरिहर वाहूरवाघ हिने विझोरा येथे जाऊन प्रत्यक्ष शेतामध्ये भेटी देऊन शेतकर्यांना पीक फवारणीबाबत मार्गदर्शन केले.दरम्यान विझोरा येथील शेतकर्यांना शेतात पिकांवर औषधि फवारणी करतांना शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करावा कारण गढूळ पाण्याचा वापर केला तर औषधांवर विपरीत परीणाम होऊन कीटकांवर होणारी औषधाचित शक्ति कमी होते. असे अर्पिता वाहुरवाघ ह्या कृषीकन्याने शेतकऱ्यांशी चर्चा करतांना स्पष्ट केले.शेतामधिल प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल मुराई व कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर, प्रा. डी. टी. बोरकर व इतर प्राध्यापक वर्गाला मोलाचे मार्गदर्शन लावले.