महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड .(दि.5.) अंबड तालुक्यातिल दहेगाव येथील गणेश दिलीपराव जाधव यांना मुंबई येथील वर्डालय मीडिया अँड पब्लिकेशन हाऊस यांच्या वतीने ऑनलाइन पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत पत्रकार गणेश दिलीपराव जाधव यांच्या पत्रास खुल्या गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.रोख रकमेसह प्रशस्तीपत्र या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप आहे.संपूर्ण महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातून स्पर्धकांनी या पत्रलेखन स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. विविध गटात संपन्न झालेल्या स्पर्धेत खुल्या गटातून गणेश जाधव यांनी शब्दबद्ध केलेल्या पत्रलेखनास द्वितीय क्रमांक प्राप्त करून उत्तम कामगिरी केली आहे. या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.