अकोला,दि.5 – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 314 चाचण्या झाल्या त्यात शून्य जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मूर्तिजापूर येथे पाच,अकोला महानगरपालिका येथे 253, वैद्यकीय महाविद्यालय येथे 49, हेगडेवार येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 314 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शून्य जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.