मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रे को-ऑप सोसायटी लि .नागपुर शाखा – हिवरखेड यांच्या वतीने Go Green Go Neem योजने अंतर्गत ११०० कडु निंबाचे रोप लावण्याचा उपक्रम राबविला.दि.१ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत संस्थेच्यावतीने एक लाख कडु निंबाचे झाडाचे वृक्षारोपण करण्याचे योजले आहे.त्यापैकी हिवरखेड शाखा ११०० झाडाचे वृक्षारोपण विविध ठिकाणी व शाळेमार्फत केले.त्यामध्ये विविध शाळा,कॉलेज, जिनीग अँड प्रेसिंग यांनी सहभाग दर्शविला,सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात संस्थेचे कर्मचारी शाखा व्यवस्थापक श्री निलेश म्हसाळ, श्री निलेश मानकर,श्री तुषार देशमुख,श्री रितेश गुप्ता,कु.शारदा अरबट,श्री सुनील ढोरे,श्री अभिषेक नाईक,तसेच दैनिक प्रतिनिधी सर्वश्री एकनाथ भोपळे,दीपक भुडके,अमोल पिसोळे, गजानन जवकार, राजेश मानकर,कैलास अग्रवाल,सागर मोरोकर,व सचिन गावंडे हे सर्व उपस्थित होते,व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला.