गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने ग्रामीण भागातील मतदारांचे शहरात नाव नोंदविण्याचे प्रयत्न चालू असून
एका व्यक्तीने दोन ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवून नियमांचे उल्लंघन करू नये व दुहेरी मतदानाचा दुरुपयोग टाळन्या करिता उपाययोजना कराव्यात याकरिता तेल्हारा विकास मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता काही राजकीय मातब्बर मंडळींनी या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागातील बहुतांश मतदारांची नावे तेल्हारा शहरातिल काही भागांमध्ये नोंदविल्याची शक्यता वर्तविली जात आहे नगरपरिषदेच्या निवडणुकी करिता मतदार यादी ही पारदर्शक व्हावी याकरिता खरोखर जे मतदार तेल्हारा शहरांमध्ये राहतात त्यांचीच नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे जर का ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरांमध्ये काहीजणांनी हेतुपुरस्पर पणे नोंदविली असल्यास अशांवर कारवाई करून किंवा त्यांची नावे वगळून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी त्या मतदार यादी मध्ये खरोखरच शहरातीलच नावे आहेत की ग्रामीण भागातील नावे समाविष्ट करण्यात आली याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून ज्यांचा तेल्हारा शहराशी काहीएक संबंध येत नाही ज्यांची मालमत्ता शहरांमध्ये नाही ज्यांचे रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल ,नळ बिल , आधार कार्ड अश्या कुठल्याही प्रकारचे कागदपत्र ज्यांच्याजवळ तेल्हारा शहरातील नाहीत किंवा दोन्ही ठिकाणी आहेत अशांची नावे जर शहरांमध्ये नोंदविल्या गेले असेल तर ते कायद्याचे उल्लंघन होणार आहे तसेच शहरांमध्ये सुद्धा एका दूरवरच्या मोहल्ल्यातील नावे दुसऱ्या मोहल्ल्यातील भागांमध्ये नोंदविण्याचे सुद्धा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी ग्रामीण भागातील नावे शहरांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रकार घडला काय या सर्व बाबींची शहनिशा करूनच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी अशी मांगनी तेल्हारा विकास मंचच्या वतीने तहसीलदार तेल्हारा यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर ,युवक आघाडी अध्यक्ष सोनू सोनटक्के स्वप्नील सूरे गौरव धुळे मोहन श्रीवास संतोष राठी शेख ताजुद्दीन मंगेश मामानकर सोनू गाडगे विजय इंगळे सुनील फाटकर आकाश बावणे लखन मामनकार वैभव मानकर निलेश धारपवार अक्षय ठाकूर इत्यादी मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारांनी जर का ग्रामीण भागात व शहरी भागात अशा दोन ठिकाणी नाव नोंदविले असल्यास व ते निदर्शनास आल्यास या सर्व गोष्टींची पडताळणी करून मतदारांनची नियमानुसार एकाच ठिकाणी नोंद केल्या जाणार .
डॉ. संतोष येवलीकर
तहसीलदार तेल्हारा