अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम भंडारज येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केली असून.या घटनेबाबत पातूर
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या घटनेची माहिती राजेंद्र रामदास गोंडचवर राहणार खरप हल्ली मुक्काम किर्ती नगर अकोला यांनी पातुर पोलिसांना दिली असून. सदर भंडारज बुद्रुक येथील विवाहित महिला अर्चना महेंद्र शेंडे वय 35 वर्ष राहणार भंडारज या महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.सदर आत्महत्याही एक जून चे सकाळी 8:30 वाजता चे पूर्वी झाली आहे. पातुर पोलिस स्टेशनचे बीट
जमादार मोहन भारस्कर, केकन मेजर, निलेश भगत महीला होमगार्ड माधुरी उमाळे यांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास पातुर पोलीस करीत आहे.


