गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- शहरातील सर्वात मोठे उद्यान असलेले माँ जिजाऊ , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानामध्ये गाढव व डुकरांचा मुक्तसंचार असून हे उद्यान समस्यांच्या विळख्यात सापडले असून येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे आणि जे प्रवेश द्वार टिन पत्राने सजविले आहे ते काढून तेथे भव्य असे दोन प्रवेशद्वार बांधण्यात यावे तसेच पालिकेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरांमध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे लिहिन्यात यावे याकरिता तेल्हारा विकास मंच युवा आघाडीच्या वतीने ३१ ऑगस्टला नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.जेथे कशाचीही आवश्यकता नाही तेथे लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु तेल्हारा शहरातील माँ जिजाऊ , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे प्रवेशद्वार मात्र टिन पत्राने बांधल्या जाते ही मोठी शोकांतिका आहे आणि हा महापुरुषांचा अपमान सुद्धा समजल्या जातो त्यामुळे येथे भव्य असे दोन प्रवेशद्वार बांधण्यात यावे तसेच या उद्यानामध्ये गाढव डुकरांचा मुक्त संचार असल्यामुळे हे उद्यान गाढव व डुकरांसाठी कि मानसासाठी आहे हे समजणे पलीकडे गेले आहे त्यामुळे या उद्यानाच्या सौंदर्यीकरनाकडे लक्ष देण्यात यावे व पालिकेच्या प्रवेशद्वारावर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे मोठ्या अक्षरात लिहून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी कारण येथे लहान अक्षरांमध्ये सर्वात खाली छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे लिहिलेले आहे . सदर मांगणीचा ८ दिवसांच्या आत विचार न केल्यास व मागण्या मंजूर न झाल्यास आपन महापुरुषांचा अपमान करत आहात असे समजून तेल्हारा विकास मंच युवक आघाडी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी तेल्हारा विकास मंच युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के ,स्वप्निल सूरे ,गौरव धुळे शे .ताजुद्दीन , मंगेश मामनकार ,मोहन श्रीवास , संतोष राठी ,विजय इंगळे , सोनू गाडगे ,सुनील फाटकर ,आकाश बावने ,लखन मामनकार ,वैभव मानकर . नीलेश धारपवार .अक्षय ठाकुर इत्यादि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











