गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
पोलीस स्टेशन तेल्हारा येथे दि . ३०/ ०५ / २०२१ रोजी पंचायत समिती क्वार्टर मध्ये गळफास घेतल्याचे दिसून आलेले मृतक नामे सुरेंद्र ज्योतिराम भोजने वय ५६ वर्ष रा . पंचायत समिती क्वार्टर तेल्हारा . यांचे मरणाबाबत पो.स्टे . तेल्हारा येथे दि .३०/ ०५ / २०२१ रोजी मर्ग नं १ ९ / २१ दाखल करण्यात आला होता . मर्गचे तपासात सदर व्यक्तीचा मरणाबाबत शंका असल्याने तपास अधिकारी यांनी शवविच्छेदन करणे कामी प्रेत न्यायवैदयक शास्त्र विभाग शासकीय वैदयकिय महाविदयालय अकोला यांचे कडे पाठविले असता , सदर व्यक्तीचा मृत्यु हा गळा आवळून झाल्याचे डॉक्टरांनि लेखी अभिप्राय दिल्याने सदर प्रकरणात पो.स्टे . तेल्हारा येथे मर्ग तपास अधिकारी पोहेकॉ काळे ब नं .१४३८ यांचे फिर्याद वरून अप . क्र .२५७ / २१ कलम ३०२,२०१ भादंवि प्रमाणे दि .०१ / ०६ / २०२१ रोजी चे ०२:४४ वा . गुन्हा दाखल करण्यात आला होता . तपासामध्ये वरीष्टांचे मार्गदर्शनात तपास करत असताना फोनचे सि डी आर व एस डि आर च्या मदतिने संशयित नामे १ ) शेख रिजवाना उर्फ फैजू शेख निसार वय २० वर्ष रा . गाडेगाव ( २ ) आकाश सुरेश भोजने वय १ ९ वर्ष रा . साईनगर तेल्हारा असे दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता दोन्ही आरोपिंनी संगनमत करून सुरेंद्र भोजने यांचा दोरी ने गळा आवळून खुन करून पोलीसांना संशय येवू नये म्हणून गळयाला दोरी बांधून मृतकाने गळफास घेतल्याचा बनाव केला असल्याचे दोन्ही आरोपिंनी कबूल केले आहे . सदर खुन हा आरोपी आकाश याने त्याचे आई वडील यांना मृतक याने दि .२ ९ / ०५ / २०२१ रोजी घरी येवून शिवीगाळ केली त्याचा राग आल्याने केल्याचे सांगितले आहे . दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अटकेची कारवाई करणे सुरू आहे . सदर तपासामध्ये गुन्हा उघडकीस आणने कामी मा . पोलीस अधिक्षक जि.श्रीधर सो . मा . अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राउत मॅडम अकोला , यांचे मार्गदर्शनात मा . प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्री . महल्ले सा . मा . पोलीस निरीक्षक स्था.गु.शा श्री सपकाळ सा . पोलीस निरीक्षक श्री . नितीन देशमूख सा . सपोनि . चव्हाण स्था.गु.शा. व त्यांची टिम तसेच तपास अधिकारी पोउपनि . गणेश कायंदे व अंमलदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी काम पाहिले .


