रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद,आक्रमक
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
गुलाब नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत राखी राजकुमार जाधव बी.एस. सी.भाग.१ ला २०१९-२० ला प्रवेशित होती.सदरहू विद्यर्थिनीने भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरला व महाविद्यालयात पाठविला परंतु महाविद्यलयाच्या क्लर्क लॉगिन मधून अर्ज प्राचार्यांच्या कडे पाठविण्यात आला.त्यामध्ये त्रुटी असल्याने रितसर विद्यार्थिनीला त्याबद्दल कळविणे हे महाविद्यालय प्रशासनाचे काम होते.परंतु सदर विद्यार्थिनीला ह्या सर्व प्रकारामुळे आर्थिक शैक्षणिक व मानसिक नुकसान झाले असून सादर प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या गुलाब नबी आझाद महाविद्यालयातील प्राचार्य व जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थिनीला पुढील शैक्षणिक सत्रासाठी शिष्यवृत्ती चा लाभ देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त ह्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.ह्यावेळी विद्यार्थिनी राखी जाधव, सनी सिरसाट,सागर इंगळे,स्वप्नील शेजाव आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.