योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – ग्रामिण महाराष्ट्राच्या हितासाठी व सदस्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रथमच सर्वपक्षीय संघटना कैलास गोरे पाटील यांनी स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीने आज संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.लवकरच जिल्ह्यातील सर्व जि.प. व पं.स. सदस्यांची याबाबत विस्तृत बैठक प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. चंद्रपुर येथे आज जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. जिल्हापरिषद व पंचायत समिती ही शासन निधीची व योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. असे असतांना शासनाने अनेक अधिकार कमी करुन विभागीय आयुक्तांकडे व राज्य शासनाकडे वर्ग केल्या गेल्या आहेत. आज दिलेल्या निवेदनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदार असावा, जि.प.व पं.स. यांचे राजकीय आरक्षण किमान दहा वर्षासाठी कायम असावे , जि.प. व पं. स. मध्ये मनोनित ( को ॲाप ) सदस्यांची नियुक्ती करावी , ७३/७४ वी घटनादुरुस्ती पुर्णपणे राज्यात लागु करावी, पुर्वी प्रमाणे असणारे किमान बदली अधिकार आणि कर्मचारी नियंत्रणासाठी सी.आर. रिपोर्ट ईत्यादी सारखे अधिकार असावे, पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषदे साठी मतदानाचा अधिकार असावा, जिल्हापरिषद सदस्यांना वीस हजार तर पंचायत समिती सदस्यांना दहा हजार रुपये मानधन असावे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता .निवेदन देतांना संघटनेचे जिल्हा संयोजक व जि.प.सदस्य संजय गजपुरे, जि.प. उपाध्यक्षा रेखाताई कारेकर, माजी जि.प.अध्यक्ष व कॅांग्रेस चे गटनेते सतिश वारजुकर, जि.प.बांधकाम व अर्थ सभापती राजुभाऊ गायकवाड, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, कृषीव पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे, ब्रम्हपुरी पं.स. सभापती रामलाल दोनाडकर, चिमुर पं.स. सभापती सौ. लताताई पिसे, गोंडपिपरीचे उपसभापती अरुण कोडापे, जि.प. माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि.प.सदस्य सर्वश्री रमाकांत लोधे, राहुल संतोषवार, ममता डुकरे, स्वाती वडपल्लीवार, गजानन बुटके, स्मिताताई पारधी, प्रमोद चिमुरकर, ज्योतीताई वाकडे, प्रविण सुर तसेच पं.स. सदस्य सर्वश्री प्रदिप कामडी, पुंडलिक मत्ते, शांताराम सेलवटकर, नर्मदा रामटेके, इत्यादी जि .प. व पं.स.सदस्यांची उपस्थिती होती.