हिवरखेड-२३ ऑगस्ट
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
शिवसेना-युवासेना हिवरखेड शहर द्वारे पाच सप्टेंबर शिक्षकदिनानिमित्त “ऑनलाईन शिक्षण पद्धती फायदेशीर आहे किंवा नाही ” या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. ही निबंध स्पर्धा निःशुल्क असून वयाची अट नाही.या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस १५०१ रु.स्व.भाऊदेवराव गीऱ्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मनिष गीऱ्हे यांच्यातर्फे,द्वितीय बक्षिस १००१ रु.स्व.शालिनीताई भांबुरकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ अंकेश भांबुरकर यांचे तर्फे तर तृतीय बक्षिस ७०१ रु.प्रशांत प्रभाकरराव भोपळे यांचेतर्फे देण्यात येणार आहे. बक्षिस वितरण प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी १७ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. बाहेरचे स्पर्धक विजेते ठरल्यास बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.निबंधाची शब्दमर्यादा १००० शब्दांची असून स्पर्धक आपला निबंध मराठी,हिंदी,इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत पाठवू शकतो.निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख पाच सप्टेंबर आहे.स्पर्धक आपले निबंध गौतम इंगळे,विजय दुधे,अमोल येऊल, श्रीकांत परनाटे,माधव गावंडे या शिक्षकांकडे जमा करू शकतात. पोस्टाने निबंध पाठवायचा असल्यास शिवसेना कार्यालय,द्वारा आकाश इंगळे,,जुनी गढी हिवरखेड (रूप) ता.तेल्हारा.जिल्हा अकोला ४४४१०३ या पत्त्यावर निबंध पाठवू शकतात.इ-मेल द्वारे निबंध पाठवायचा असल्यास shivsenahiwarkhed@gmail.com या इ-मेलवर पाठवू शकतात.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या निबंध स्पर्धेत सहभागी होऊन ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल आपले विचार निबंधरुपात मांडावे असे आवाहन शिवसेना हिवरखेड शहर प्रमुख आकाश इंगळे यांच्यासह अभिषेक धांडे, अंकुश निळे,नितीन नांदोकार,अक्षय नाठे प्रफुल कवळकार तथा समस्त शिवसैनिकांनी केले आहे.











