मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
पत्रकारितेच्या क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या हिवरखेड शाखेने नेहमीच विविध उपक्रम राबवून जनसामान्यांमध्ये आपला ठसा उमटविला आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शाखा हिवरखेड ची बैठक जिल्हा उपाध्यक्ष संदिप इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक राजेश पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत संदिप इंगळे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. ज्यामध्ये नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जाहीर कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी राहुल गिऱ्हे यांची वर्णी लागली असून कार्याध्यक्षपदी जितेश कारिया, उपाध्यक्षपदी उमर बेग मिर्झा, सचिवपदी अनिल कवळकार, कोषाध्यक्षपदी सुरज चौबे, संघटकपदी अर्जुन खिरोडकार, सहसचिवपदी जावेद खान, प्रसिद्धी प्रमुखपदी धिरज बजाज अशी सर्वांची नियुक्ती सर्वसंमतीने करण्यात आली. समस्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर संघटनेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविणार असून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील आणि वरिष्ठांनी दाखविलेला विश्वास सार्थकी ठरवेल असे मनोगत राहुल गिऱ्हे यांनी व्यक्त केले. गावकऱ्यांनी आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले.