वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : सध्या लाॅकडाऊन नंतर धुमधडाक्याने नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक या वर्षाच्या अखेर होईल असे च संकेत अधिकृत सूत्रांनी दिल्याने,नवयुवकांच्या नजरा संभाव्य निवडणूकी कडे लागल्या असून,चौका चौकात निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे.मागील नोव्हेंबर २०२० मध्ये कार्यकाळ संपुष्टात आला.प्रशासक म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी राळेगांव यांना शैलेशजी काळे आणि मुख्याधिकारी अरुणजी मोकळं यांनी या वर्ष भरात अनेक प्रश्न निकालात काढायला सुरुवात केली,मात्र या मुळे अनेकांच्या पोटात चांगले च दुखायला लागलं आहे.कोरोणा च्या दोन मोठ्या लाॅकडाऊन मुळे सर्व च राजकीय पक्षा मध्ये आलेली मरगळ झटकून नव्या दमाने पुढील नियोजन सुरु केल्याचे निदर्शनास येत आहे.काँग्रेस आणि भाजपा कडून उमेदवारी मिळावी म्हणून शेकडो इच्छुक बाशिंग बांधून तयार होत आहे तर इकडून जमलं नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह अन्य राजकीय पक्षाकडे ऐनवेळी जाऊ असाही विचार अनेकांच्या मनात आहे. नवनिर्मित नगर पंचायत राळेगांव च्या पहिल्या निवडणूकीत भाजपाचे दहा नगरसेवक नगरसेविका निवडून आले होते. पण अवघ्या अडीच वर्षात भाजपा ची दोन शकले नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा की पदलालसे पोटी काँग्रेस ने असंतुष्टांना सोबत घेऊन करुन दाखवली.याचा कितपत फायदा होईल हे तर निकालाअंती कळेल.
सध्या झालेलं एक राजकीय स्थित्यंतर अनेक गुढ समस्ये ची उकलं करुन गेल्याची चर्चा जोरात असून,दोन्ही “सर” आणि “भाऊ” सर्व छोट्या छोट्या गोष्टी कडे बारीक लक्ष ठेवून,पाच वर्षे झालेला त्रास डोक्यात ठेऊन पुढील रणनीती आखतील,असाच राजकीय निरिक्षकांचा कयास चर्चेअंती ऐकावयास मिळत आहे हे विशेष


