महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.१:- भर उन्हात विनाकारण फिरणा-या ७१ नागरिकांची अॅन्टिजेन चाचणी केली असता ५ नागरिक पाॅझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.दि.३१ मे रोजी भद्रावती शहरातील मुख्य रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपसमोर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तहसीलदार महेश शितोळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय आसुटकर, न.प.चे उपमुख्याधिकारी जगदिश गायकवाड आणि रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार महेश शितोळे यांनी नागरिकांना केले आहे.


