राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी – चामोर्शी तालुक्यातील भेंडाला प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आमदार डॉ देवराव होळी यांच्या सतत पाठपुराव्याने पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे काही दिवसा आधी निधी अभावी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम थांबले होते परंतु आमदार डॉ देवराव होळी यांच्या सतत पाठपुराव्यामुळे येथील रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध झाला. व पुन्हा जोमाने कामाला सुरुवात झाली व या कामाची पाहणी आमदार डॉ होळी यांनी केली.
आता सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम प्रगती पथावर आहे यावेळी काम करणाऱ्या एजन्सी यांना सदर काम तत्काळ मुदती पूर्व पूर्ण करावे असे निर्देश दिले. व सदर विकास काम मुदती पूर्व न करणाऱ्या कंत्राटदार यांच्या वर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकारी यांना दिले. व या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व पदाना तत्काळ मान्यता देऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री महोदय व आरोग्य सचिव यांच्याशी पत्र पाठवून व भ्रमण ध्वनी वर बोलून अवगत केले. यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्ह्यातील मॉडेल आरोग्य केंद्र म्हणून तयार करण्याचा संकल्प आहे, याकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आमदार डॉ होळी यांनी सांगितले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, ज्येष्ठ नेते जयराम चलाख युवा मोर्चा नेते प्रतीक राठी व पदाधिकारी उपस्थित होते


