महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.20 : श्री गुरुदेव गुरुकुल गुरुकुंज मोझरी येथे आयोजित दोन दिवसीय प्रबोधनकार व प्रचारक चिंतन शिबीर २०२१ मध्ये भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील गुरुदेव प्रचारक नरेंद्र जीवतोडे यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय ग्रामविकासाच्या दिशेने (ग्राम सभा) हा होता. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामसभेचे अधिकार कोणते आणि गावाच्या विकासासाठी ग्रामसभा कशी आवश्यक आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या चिंतन शिबिरात सप्त खंजेरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज आकोट, भाऊसाहेब थुटे वर्धा, प्रा.गणेश हलकारे अमरावती, ज्ञानेश्वर रक्षक नागपूर आणि प्रा. प्रेमकुमार बोके अंजनगावसुर्जी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. नरेंद्र जीवतोडे यांच्या रुपाने भद्रावती तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळाल्याने तालुक्यातील गुरुदेव प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. जीवतोडे हे मागील अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य करीत असून त्यांच्या नंदोरी या गावी त्यांच्याच पुढाकाराने गुरुदेव सेवा मंडळाचे प्रार्थना सभागृह नुकतेच साकार झाले.