अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : महाराष्ट्र माळी युवक संघटनेची नविन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून अकोला जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत बारतासे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ नेते प्रा,शत्रुघ्न बिडकर हे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे, सचिन धानोकर बाळासाहेब निमकर्डे परसराम बलक आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत गजानन बारताशे यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय राऊत,सुजित घाणे, महेश तायडे,सुनील बंड,राहुल गीऱ्हे व जिल्हा महासचिव म्हणून जीवन ढोणे, नीलेश उमाळे,सचिन तायडे,शिवा हुषे, विलास हरमकार आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तेल्हारा तालुकाध्यक्ष सचिन भड, सोशल मीडिया प्रमुख प्रज्वल तायडे, राहुल राऊत तर बाळापूर तालुका उपाध्यक्ष भूषण करांगळे, तालुका उपाध्यक्ष नितीन इंगळे, पातुर शहर अध्यक्ष डिगांबर फुलारी, बाळापुर शहराध्यक्ष प्रसाद इंगळे यांची नियुक्ती करन्यात आलीआहे. कार्यक्रमाचे संचलन महेश तायडे यांनी तर आभार प्रदर्शन निलेश उमाळे यांनी केले.