अकोला, दि.१०(जिमाका)- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. या योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हाव्यवस्थापक यांनी केले आहे.
महामंडळामार्फत २० टक्के बीज भांडवल योजने अंतर्ग पाच लक्ष रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यात बॅंकेचा सहभाग ७५ टक्के महामंडळाचा २० टक्के तर लाभार्थ्याचा सहभाग पाच टक्क असतो. कर्ज परतफेडीची मुदत पाच वर्षांची असते. थेट कर्ज योजनेत एक लक्ष रुपयांचे कर्ज चार वर्षांच्या कर्ज परतफेडीच्या मुदतीने दिले जाते. वैयक्तिक जर्म व्याज परतावा योजनेत १० लाख रुपयांची अर्ज मर्यादा असून गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ५० लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळास भेट द्यावी. अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.