वनकायदा शिथिल करा.
मुख्यमंत्री यांना निवेदन
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली- जिल्हयात दारू चालू करण्या साठी आणि मोहा च्या फुलांवर आधारित कारखाने सुरू करण्यात यावी. जेणेकरून या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल तसेच विषारी दारू पासून मुक्तता मिळेल असे निवेदन शिवसेनेचे तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) सुभाष घुटे यांनी मुख्यमंत्री यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, चंद्रपूर जिल्हयात दारू सुरू करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. असाच निर्णय गडचिरोली जिल्हात घेण्याची आवश्यकता आहे. गडचिरोली जिल्हयात वन कायद्यामुळे जिल्हयातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. या कायद्याचा फायदा घेत जिल्ह्यामध्ये काही बेकायदेशीर संघटना उभ्या झाल्या. आणि त्यांनी या जिल्ल्यामध्ये दारूबंदी करण्याकरता स्वतःच्या स्वार्थासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुठभर काही सामाजिक कार्यकर्ता स्वतःला मसीहा समजून या गडचिरोली जिल्यावर राज करीत आहेत. आणि त्यांना शासनाकडून सहकार्य सुद्धा मिळत आहे. वन कायद्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कारखाने आले नाहीत, रेल्वे लाईन आल्या नाहीत, धरणं झाली नाहीत, रोड झाले नाही, दळणवळणाची साधने नाही, त्याचाच फायदा घेऊन शासनाच्या विरोधात काम करणारी संघटना मोठी झाली आणि आज संघटनेमुळे या जिल्याच विकास झाला नाही. त्या संघटनेने रोड होऊ दिले नाही कारखाने होऊ दिले नाही पुलीया होऊ दिलं, त्यांना माहित आहे या जिल्ह्यामध्ये जर कारखाने निर्माण झाले रेल्वे आली आपलं अस्तित्व नष्ट होईल त्यामुळे या जिल्हयाचा विकास अशा संघटना होऊ देत नाहीत, अशा लोकांना न घाबरता या जिल्ह्यामध्ये दारूबंदी हटवण्यात यावी, आणि या जिल्ह्यांत मोहफुल पासून दारुची निर्मिती करणारे दोन ते तीन कारखाने झाली पाहिजे, लोह खानिज जे कारखाने झाली पाहिजे, सिमेंटचे कारखाने झाले पाहिजे, आणि वन कायद्यामध्ये केंद्र शासनाची बोलून त्या कायद्यामध्ये शिथिलता आणली तर अशी अनेक प्रकारची कारखाने या ठिकाणी होऊ शकतात हे झाले तरच या जिल्हयाला नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून लागलेला कलंक मिटणार. असे निवेदन देऊन शिवसेनेचे सुभाष घुटे तालुका प्रमुख अहेरी(ग्रामीण) मागणी केली.