माजी आमदार सिरस्कार यांच्या पाठपुराव्याला यश
अभिजित फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेश टोपे यांनी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्राद्वारे निर्देश दिले.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघामध्ये पातूर तालुक्यातील चतारी येथे ग्रामीण रुग्णालय असून या गावाला ४५ते५० खेडे गाव जोडून आहेत.या भागातील नागरिकांना कोविड आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्यांना उपचार करिता दूर अकोला शहरा ठिकाणी जावे लागते.महामारीच्या काळात सर्वांना प्रवास करणे शक्य होत नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.पातूर तालुक्यातील कोविड रुगणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या साथीच्या आजाराची लागण झाल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावा करिता त्यांना बाळापूर विधानसभा मतदार संघातील पातूर तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांसह ऑक्सिजन,मिनी व्हॅटिलीटर आदी सुविधेसह कोविड १९ उपचार केंद्र सुरू करून दिल्यास बहुतांशी साथरोग आटोक्यात येऊन गावातील व गावाला जोडलेल्या इतर खेड्यातील सर्व नागरिकांना त्याचा लाभ मिळेल.तरी चतारी ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधेसह कोविड केअर सेंटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे.अशी मागणी बाळापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बळीराम सिरस्कार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेश टोपे यांच्याशी चर्चा व पत्राद्वारे मागणी केली असता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सदर पत्राच्या विनंती नुसार कार्यवाहीचे निर्देश दिले.


