अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव तालुक्यातील वनपरिक्षेत्रानील अमाना वर्तुळा अंतर्गत येत असलेल्या तपोवन नियत क्षेत्रामध्ये मालेगांव येथील विलास अर्जुन बळी यांच्या शेतामध्ये तीन अज्ञात इसम मोर व वन्यप्राणी ससा यांची शिकार करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून शिरपूर जैन येथील तीन संशयित इसमांना वन्यपक्षी व वन्यप्राणी पकडण्याचे जाळेसह वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९ ७२ अन्वये कार्यवाहि करण्यात येवुन वन्यजीव अपराध क . १८८७२७/०२ नोंदविला आहे . सदर कार्यवाहि ही उपवनसंरक्षक सुमंत एम.मोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एम.आर नंदुरकर , वनपाल एम.पी गोड, जी.ए.जुजारे बनरक्षक जी.पी.देवढे वनरक्षक ,आर . आर.गटोड वनरक्षक , डि.पी. मानप वनरक्षक , एम.टी. कुटे , वनरक्षक आदींच्या पथकाने केली आहे.