सदानंद पुरी शहर प्रतिनिधी माहुरगड
माहुरगड ..शहरात भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात शांततेत साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामचंद्र प्रभुंच्या जयघोषाने अवधी माहुरगड नगरी दुमदुमली होती. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी माहुरगड येथील राममंदिरात श्रीरामाचे भक्तीमय वातावरणात अभिषेक पुजन महाआरती करण्यात आली, तसेच श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश लाड, उपाध्यक्ष विकास जोशी, सचिव कालिदास नैताम, कोषाध्यक्ष अक्षय बोरकर, व मार्गदर्शक नगरसेवक सागर ( गोपू ) महामुने, सोनू पाटील चौधरी,अभिषेक त्रिपाठी, विनोद पाटील सूर्यवंशी, वैभव लाड, पवन शर्मा, किशोर राठोड पवन दातीर यांनी श्रीराम जयंती उत्सवाचे अप्रतिम नियोजन केले होते, त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव समीतीतर्फे दुपारी ४ वाजताच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर बारीपुरा, श्री कपिलेश्वर महादेव मंदिरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून श्रीरामचंद्र प्रभुंच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत भारतमाता, श्री राम, लक्ष्मण सीता, महारुद्र श्री हनुमानाचे देखावे सादर करण्यात आले होते. व डीजेच्या गाण्यावर ताल धरून श्रीरामभक्त तल्लीन झाले होते. शहरात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत व पूजन करण्यात आले तसेच श्रीरामभक्तांसाठी ठिकठिकाणी महाप्रसाद, थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी १० वाजता श्रीराममंदिरा मध्ये महाआरती ने या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. ही शोभायात्रा शांततेत पार पाडण्यासाठी माहूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रकाशजी मुळे साहेब .पालसिंग ब्राह्मण साहेब व सर्व पोलीस स्टाफ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


