संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय घाटंजी येथे भूमापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भूमापन दिन भूमिअभिलेख विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असतो परंतु घाटंजी येथील कार्यलयात नव्याने रुजू झालेले निरंजन पवार उप अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासात पहिल्यांदा घाटंजी कार्यालया मध्ये भूमापन दिन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार विजय साळवे व नगर परिषद मुख्याधिकारी राजू घोडके निरंजन पवार उप अधिक्षक भूमि अभिलेख घाटंजी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजन करण्यात आले होते.भूमि अभिलेख विभाग काळानुरुप आधुनिकतेकडे वाटचाल करीत असुन त्या नुसार मोजणी कार्यवाही, फेरफार कार्यवाही, नक्कल प्रक्रीया व इत्यादी बाबी सुध्दा ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहे. ई मोजणी वर्व्हेजन 02 व्दारे मोजणी करीता ची प्रकीया ईपीसीआयएस प्रणालीव्दारे वारस फेरफार अर्ज, नोदणीकृत दस्ताऐवजा व्दारे ई फेरफार अर्ज, ई रेकॉर्ड, ई नकाशा, आधुकनिक रोव्हर यंत्राव्दारे शेती ची मोजणी व स्वामीत्व योजन माहिती पीपीटी च्या वतीने दाखवण्यात आले आपले सरकार अंतर्गत नक्कल करीताचे अर्ज सुध्दा ऑनलाईन पध्दीने ने भूमि अभिलेख विभागा मध्ये स्विकारण्यात येत आहेत. या नुसार अर्जदार यांना त्यांचे अर्जा बाबत ची अचुलक माहीती ऑनलॉईन पध्दीतीने उपलब्ध होत आहे त्या नुसार सामान्य जनतेला भूमि अभिलेख विभागा मार्फत होणा-या आधुनिकते बाबत माहीती चे सादरीकरण शुभम देशमुख यांनी केले. मान्यवर यांच्या हस्ते तालुक्यातील मौजा चोरंबां गोविंद चटूले धनसिंग ढालेवाले गंगाधर कलांरे महादेव शेडमाके या गावाचे सदन वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन शिल्पा तुरकर यांनी केले तर आभार सुनिल शेलोटकर संगीता वासनिक पवन गोदमले इत्यादी सदर कार्यक्रम यशस्वी करिता परिश्रम घेतले.


