स्वरूप गिरमकर
तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर : उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळ्यांच घरांमध्ये थंड पाणी प्यायले जाते. फ्रिजमधील किंवा मातीच्या मडक्यातील थंड पाणी प्यायले जाते.सर्वच ऋतूंमध्ये पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पण अनेकांना नेहमीच बाहेरून आल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय असते. पण नेहमी नेहमी फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिण्याऐवजी नारळ पाणी, ताक, दही, फळांचा रस इत्यादी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते. नियमित 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर निरोगी राहते.दैनंदिन आहारात नेहमीच फ्रिजमधील थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. याशिवाय आयुर्वेदामध्ये थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरसुद्धा थंड पाणी न पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आज आम्ही फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.फ्रिजमधील थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयाची गती वाढण्याची शक्यता असते. याशिवाय हृदयाच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे व्हॅगस मज्जातंतूवर परिणाम होऊन काहीवेळा हृदयाची गती वाढते किंवा कमी होऊन जाते. याशिवाय शरीराच्या रक्त भिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. चक्कर येणे, थकवा येणे आणि अशक्तपणा इत्यादी समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. थंड पाण्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम लगेच दिसून येतो.थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. थंड पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि आतडयांना हानी पोहचण्याची शक्यता असते. अन्नपदार्थ पचन होण्यास अतिशय जड जातात. आतड्यांची हालचाल मंदावते, आतडे आकुंचन पावणे किंवा आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल दिसून येतात.थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. फ्रिजमधील थंड पाण्याचा शरीरावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे घशात सूज, जळजळ किंवा वेदना जाणवू लागतात. या सर्व वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्याचे सेवन केल्यास वारंवार खोकला लावून घशातील इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते.


