माजी सभापती यांनी केली नुकसान भरपाई ची मागणी…
गणेश वाघ ग्रामीण प्रतिनिधी कसारा
काल संध्याकाळी 4 एप्रिल रोजी मोखाडा तालुक्यातील खोडाळा भागात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झालेआहे.दुधगाव,खोडाळा,जोगलवाडी व अन्य गावातील घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी शासनाकडे केली आहे.दुधगाव येथील अनेक घरांमध्ये अन्य धान्य,कपडे, कागदपत्रे पावसामुळे खराब झाले आहेत.तसेच किरकोळ दुखापत देखील घरातील व्यक्तींना झाली आहे.त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..


