संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- नगर परिषदे अंतर्गत शहरातील उर्दू हायस्कूल इय्यता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग असून याठिकाणी केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून तेही तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होत असल्याने विध्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर विषय उपस्थित झाल्याने येथे आवश्यकते नुसार शिक्षक द्यावे अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे.इय्यता आठवी ते दहावी पर्यंत असलेल्या वर्गाला विषयानुरुप शिक्षकांची आवश्यकता असताना घाटंजी शहरातील उर्दू हायस्कूलला केवळ दोनच शिक्षक कार्यरत होते त्यामुळे शिक्षका अभावी विध्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला.यात विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असतानाच जे शिक्षक कार्यरत आहे. तेही तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होत असल्याने येथिल उर्दू हायस्कूल शिक्षकांविना राहील की काय? अशी भिती विध्यार्थी व पालक वर्गात शिरल्याने येणाऱ्या शैक्षणिक सत्रात विध्यार्थ्यांच्या अध्यापन कार्यात बाधा येऊ नये, विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती पुढे सरसावून मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या शाळेची गंभीर समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी नविन शिक्षकांची नेमणूक करावी. व विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख हाफिज, ऍड सादिक खान व मोहसीन चव्हाण कज्जुम कुरेशी उपस्थित होते.


