करामत शाह तालुका प्रतिनिधी, अकोला
आगर : आगर येथे राम नवमी सणासुदीच्या निमित्त शांतता समीतीची बैठक गावात कोगताही अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणुन पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे यांनी केले आहे.तसेच गावात असे कोणतेही अनुसचित प्रकार घडुन आल्यास कार्यरवाही करण्यात येईल असेही सुचना पोलीस निरीक्षक साहेब यांनी सांगितले.आगर गावातुन शंभर ते दिडशे पोलीस कर्मचारी यांचा रुट मार्च काढण्यात आले.सुरुवात बौद्ध विहार ते शिवाजी महाराज चौक ते भवानी माता मंदीर पर्यंत काढण्यात आले. यामध्ये उरळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पि.एस आय.बिड जमदार ,पोलीस पाटील,हवालदार, होमगार्ड, दामीनी पथक,व आर.पि.एफ.उरळ पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व गावतील सर्व प्रतिष्ठिक नागरिक उपस्थित होते.


