गणेश वाघ ग्रामीण प्रतिनिधी कसारा
गेल्या सहा महिन्या पासुन जिल्ह्यातील पेसा संवर्गातील ५३ आरोग्य सेवक आचार संहिता, कोर्ट केस व त्यानंतर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते; मात्र मोखाडा पंचायत समितीचे उप-सभापती व शिवसेना शिंदे गटाची बुलंद तोफ प्रदिपजी वाघ साहेब यांच्या वारंवार पाठपुराव्याने आज अखेरीस त्यांना नियुक्ती दिली.दरम्यान कोर्ट केसमुळे अडकलेली भर्ती औरंगाबाद उच्च न्यायालयाने ७ मार्च रोजी निकाली काढली त्यानंतर तात्काळ ग्रामविकास विभागाने रखडलेली भर्ती सुरू करन्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परीषदांना आदेश दिले. मात्र पालघर जिल्हा परीषदेने पेसा क्षेत्रातील उमेदवारांची अंतिम निवड यादी लावून देखील नियुक्ती आदेश देन्यासाठी वारंवार चालढकल पणा केला जात होता. त्यानंतर ही बाब उमेदवारांनी मोखाडा पंचायत समितीचे विद्यमान उप-सभापती प्रदिपजी वाघ साहेब यांच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर त्यांनी ही समस्या पालघरचे पालक मंत्री गणेशजी नाईक यांच्या जनता दरबारात २८ मार्च रोजी मांडली व त्याच वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांना देखील ही समस्या सांगितली. त्यानंतर चौधरी यांनी पुढील सोमवारी सर्व उमेदवारांना संपर्क करून नियुक्ती देतो असे सांगितले. पंरतु नियुक्ती संबंधी जिल्हा परीषद कडून दुरध्वनी केला गेला नाही. त्यानंतर ३ एप्रिल रोजी सर्व उमेदवारांनी प्रदिप वाघ यांच्याशी संपर्क साधून पुन्हा जिल्हा परीषेदेला भेट दिली. शेवटी प्रदिप वाघ यांनी परत आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला. त्यावर आजच्या आजच नियुक्ती देतो असे अधिकारी संतोष चौधरी यांच्याकडून सांगन्यात आले मात्र दिवसभर आरोग्य विभागाच्या दालनासमोर बसुन सुद्धा नियुक्ती करीता पुरेशी हालचाल केली नाही. शेवटी आज ४ तारखीला स्वतः उमेदवारासमेवत प्रदिपजींनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच त्या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देन्यास भाग पाडले यास्तव प्रदिपजी वाघ साहेब यांचे सर्व नवनियुक्त आरोग्य सेवकांकडून मनपुर्वक आभार मानले.


